जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई
7 नोव्हेंबर म्हणजे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडरकांचा शालेय दिन. याच दिनी म्हणजे 7 नोव्हेंबर 1907ला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी शाळा प्रवेश केला होता. त्यानंतर हा दिवस सर्व शाळांमध्ये विद्यार्थी दिन म्हणून साजरा करण्यात येतो.साताऱ्याच्या जुना राजवाडा जवळील सातारा हायस्कूलमध्ये बाबासाहेबांनी प्रवेश घेऊन शिक्षणाला सुरूवात केली.आणि शिक्षणामुळे त्यांच्या जीवनात क्रांती घडली.कारण ज्ञान, कौशल्य आणि कृती यांच्या जोरावर बाबासाहेबांनी भारतीय समाजात क्रांती घडवली.
त्यामुळे बाबासाहेबांचा शाळा प्रवेश युगांतराची चाहूल देणारी आणि इतिहासाला कूस बदलावयास लावणारी क्रांतिकारक घटना होती.दरम्यान बाबासाहेबांच्या या शाळा प्रवेश दिनी सर्व शाळांमध्ये विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात येते.याद्वारे विद्यार्थ्यांना बाबासाहेबांसारख्या उत्तुंग व्यक्तिमत्वाची जास्त ओळख होत राहील.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.