वडिलांचा ताण कमी करण्यासाठी तिने स्वत:ला संपवले

वडिलांचा ताण कमी करण्यासाठी तिने स्वत:ला संपवले

 जय महाराष्ट्र न्यूज, औरंगाबाद

औरंगाबादमध्ये वडिलांना लग्नाचा ताण नको म्हणून 19 वर्षीय तरुणीने विष घेऊन आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार घडलाय. राजश्री काकासाहेब सातपुते असे या तरुणीचे नाव आहे.

काही दिवसांपूर्वीच राजश्री हिचे लग्न ठरले होते. येथील काकासाहेब सातपुते यांना दोन एकर शेती आहे. त्यांच्या नावावर पाचोड येथील राष्ट्रीयीकृत बँकेचे कर्ज आहे.

यावर्षी पावसाने ओढ दिल्याने कपाशी पिकाचे अतोनात नुकसान झाले होते. त्यामुळे त्यांची आर्थिक स्थिती खालावली होती. आपल्या लग्नाकरता वडील पैशांची जुळवाजुळव कोठून करतील या विवंचनेत असलेल्या राजश्रीने अखेर स्वत|:ला संपवले.

गेल्या काही दिवसांपासून होती. याप्रकरणी पाचोड पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version