‘महाराष्ट्राप्रमाणे कर्नाटकात डबल इंजिनाचे सरकार’

‘महाराष्ट्राप्रमाणे कर्नाटकात डबल इंजिनाचे सरकार’

महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात गेले अनेक दिवस कल्लोळ सुरु आहे. त्यातच विधानसभा निवडणूका जवळ आल्या आहेत. याच पार्श्ववभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (दि. ७ मे, रविवारी) कर्नाटक दौऱ्यावर गेले आहेत. कर्नाटकात डबल इंजिन सरकार येणार असा दावा यावेळी मुख्यमंत्री शिंदेंनी केला आहे.

कर्नाटकाच्या निवडणूक जवळ आल्या आहेत. सर्वपक्षीयांकडून निवडणुकांची जोरदार तयारी सुरु आहे. महाराष्ट्रातील अनेक नेते कर्नाटक निवडणुकीच्या तयारीसाठी तिथे गेले आहेत. आता भाजपच्या प्रचारासाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे कर्नाटकमध्ये दाखल झाले आहेत. कर्नाटकमध्ये विधानसभा निवडणुकांचे वारे वाहत असल्याने सर्वच पक्ष मैदानात उतरले आहेत. तसेच, कर्नाटकातील निवडणूक ही देशासाठी महत्वाची असल्याचे त्यांनी सांगितले. तर, महाराष्ट्राप्रमाणे कर्नाटकातही डबल इंजिनाचे सरकार येईल असा दावा त्यांनी केला आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे रविवार आणि सोमवारी (दि. ७ आणि ८ मे रोजी) कर्नाटक दौऱ्यावर आहेत. यादरम्यान ते कर्नाटकामध्ये भाजपा उमेदवारांसाठी प्रचार सभा घेणार आहेत. तसेच कापू आणि उडुपीमध्ये होणाऱ्या भाजपाच्या रोडशो मध्येसुद्धा ते सहभागी होणार आहेत.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version