#MeToo या मोहिमेचा कोणीही गैरवापर करु नये असे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाने दिले आहेत.
#MeToo चळवळ ही केवळ पीडित महिलांसाठी आहे, त्याचा इतरांनी आपल्या वैयक्तीक हेव्यादाव्यांसाठी वापर करु नये, तसेच त्याचा गैरवापर होऊ नये यासाठी मार्गदर्शक तत्वे आखणं गरजेचं असल्याचं मतही उच्च न्यायालयाने व्यक्त केलं आहे.
#MeToo प्रकरणात एका महिलेने बॉलिवूडमधील दिग्दर्शक आणि निर्माता विकास बहल यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.
या संदर्भात विकास बहलने आपल्याबद्दल बदनामी करणारे वक्तव्य केल्यानं फँटम फिल्ममधील त्याचे माजी सहकारी अनुराग कश्यप आणि विक्रमादित्य मोटवाने यांच्या विरोधात मुंबई उच्च न्यायालयात अब्रुनुकसानीचा दावा ठोकला आहे.
मात्र पीडित महिलेने हे प्रकरण आणखी वाढवू न देण्याचा निर्णय घेतला आहे, त्यामुळे पीडित महिलाच हे प्रकरण वाढवू इच्छित नसेल, तर इतरांनी हे प्रकरण आपापसांत मिटवावं, असा सल्लाही यावेळी हायकोर्टाने दिला आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.