डोंबिवलीकरांचा श्वास गुदमरतोय

डोंबिवलीकरांचा श्वास गुदमरतोय

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

प्रदूषणाचा विळखा सर्वच महानगरांना बसत चाललाय. मुंबई महानगरीत तर असे अऩेक भाग आहेत, जिथं वायू प्रदूषणानं सर्वच त्रस्त आहेत.

हे वायू प्रदूषण डोंबिवलीकारांसाठी चिंतेचा विषय बनलाय. प्रदूषण नियामक मंडळ कितीही दावा करत असले तरी डोंबिवलीत प्रदूषणाची मगरमिठी अधिक घट्ट होत चाललीय, असा नागरिकांचा आरोप आहे..सध्या कारखान्यांमधून निघणाऱ्या घातक अशा वायू प्रदूषणाने डोंबिवलिकर हैराण झाले आहेत.  

डोंबिवलीत आणि परिसरात प्रदूषणामुळे बिकट परिस्थिती झालीय. घरांमध्ये काळ्या रंगाची धूळ सतत साठत असते. दिवसातून दोन ते तीन वेळा साफसफाई केली तरी पुन्हा स्थिती तशीच दिसते. शिवाय परिसरातील नागरिकांना श्वसनाच आजार जडले असून वारंवार तक्रारी करून सुद्धा प्रशासन लक्ष देत नसल्याचा आरोप स्थानिक करतायत.

डोंबिवली शहरात कारखान्यांमुळे होणाऱ्या प्रदूषणाचा त्रास स्थानिक नागरिकांना होतोय राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाने हे अप्रत्यक्षपणे प्रकारे मान्यच केलंय. मंडळानं आतापर्यंत 84 कारखान्यांना नोटिसा बजावल्यायत. डोंबिवलीतील प्रदूषणाच्या या समस्येवर शिवसेनेने आक्रमक भूमिका घेतलीय. प्रसंगी संबंधित अधिकाऱ्यांना कोंडून ठेवू, असा इशारा कल्याण डोंबिवलीचे महापौर राजेंद्र देवळेकर यांनी दिलाय.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version