Dollar Rupee Salary Hike: नोकरी तीच तरीही अचानक पगारवाढ? डॉलर-रुपया घसरणीचा जॅकपॉट! परदेशी भारतीयांचा पगार लाखोंनी वाढला

भारतीय रुपया डॉलरच्या तुलनेत घसरल्यामुळे परदेशात काम करणाऱ्या भारतीयांचा पगार भारतीय चलनात आपोआप वाढलेला दिसतो.
Dollar Rupee Salary Hike: नोकरी तीच तरीही अचानक पगारवाढ?  डॉलर-रुपया घसरणीचा जॅकपॉट! परदेशी भारतीयांचा पगार लाखोंनी वाढला

भारतीय रुपया डॉलरच्या तुलनेत गेल्या काही दिवसांत कमजोर झाला आहे. 25 सप्टेंबर रोजी रुपया 87.60 रुपयांवर आला होता, तर 26 सप्टेंबरला तो 88.70 रुपयांवर पोहोचला. या घसरणीचा थेट परिणाम परदेशात काम करणाऱ्या भारतीयांवर झाला आहे. विशेष म्हणजे, प्रत्यक्ष पगारवाढ न होता देखील त्यांचा पगार भारतीय चलनात आपोआप वाढलेला दिसतो.
 
रुपयावरील दबावाचं प्रमुख कारण म्हणजे अमेरिकेतील H-1B व्हिसाची फी वाढ, कच्च्या तेलाच्या दरातील वाढ आणि विदेशी गुंतवणूकदारांची सततची विक्री. या वर्षभरात रुपया एकूण 2.30 टक्क्यांनी कमजोर झाला आहे. त्यामुळे भारतीय बाजारपेठेवर नकारात्मक परिणाम झाला असला तरी परदेशी चलनात पगार घेणाऱ्यांना दिलासा मिळालेला आहे.
 
उदाहरणार्थ, एखादा भारतीय अमेरिकेत 80,000 डॉलर्स वार्षिक पगारावर काम करत असेल. रुपया कमजोर होण्यापूर्वी हा पगार भारतीय चलनात साधारण 69,33,574 रुपये एवढा होता. मात्र सध्याच्या घसरणीनंतर तोच पगार 71,00,800 रुपये इतका झाला आहे. म्हणजेच प्रत्यक्ष पगारात वाढ न होता केवळ रुपयाच्या अवमूल्यनामुळे त्या व्यक्तीच्या पगारात सुमारे 1.67 लाख रुपयांची वाढ झालेली आहे.
 
डॉलर-रुपया विनिमय दरातील अशा चढउतारांचा थेट फायदा परदेशात नोकरी करणाऱ्यांना होतो. मात्र दुसरीकडे आयात होणाऱ्या वस्तू, इंधनाचे दर आणि महागाई यावर याचा नकारात्मक परिणाम जाणवतो. त्यामुळे रुपया कमजोर होणं हे काहींसाठी आनंदाची बातमी असली, तरी देशांतर्गत अर्थव्यवस्थेला मात्र त्याची किंमत चुकवावी लागते.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version