8 वर्षाच्या चिमुकल्याचा कुत्र्यांच्या हल्ल्यात दुर्दैवी मृत्यू… भटक्या कुत्र्यांचा प्रश्न ऐरणीवर !-

8 वर्षाच्या चिमुकल्याचा कुत्र्यांच्या  हल्ल्यात  दुर्दैवी मृत्यू… भटक्या कुत्र्यांचा प्रश्न ऐरणीवर !-

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

भटक्या कुत्र्यांना नागरिक पुरते त्रासून गेले आहेत. पिसाळलेले कुत्रे अंगावरती धावत येत कधी चावा घेतील याचा काही नेम नाही. भिवंडी शहरातील फेणेगाव येथे रविवारी सकाळच्या सुमाराला थरकाप उडवणारी एक घटना घडली आहे. 8 वर्षांच्या चिमुकल्याचा तब्बल 7 ते 8 कुत्र्यांनी चावा घेत दुर्दैवी अंत केला आहे.

 

धीरज दिनेश यादव असे कुत्र्यांच्या हल्ल्यात मृत्यू झालेल्या मुलाचे नाव आहे. धीरज हा त्याचा मित्र सलमान अन्सारी (८) याच्यासोबत डम्पिंग ग्राऊंडवर काचगोटी गोळा करण्यासाठी महापालिकेच्या पाईपलाईनवरून चालला होता. त्यावेळी धीरजचा पाईपलाईनवरून पाय घसरला आणि तो खाली झोपलेल्या कुत्र्यांच्या अंगावर पडला. त्यामुळे अचानक जागे झालेल्या ७ ते ८ कुत्र्यांनी धीरजवर चवताळून जोरदार हल्ला केला आणि त्यातच त्याचा मृत्यू झाला. 

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version