जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई
आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या मुलांना सरकारी नोकरी देण्याचा निर्णय सरकारनं घेतला आहे.
परिवहन मंत्री दिवाकर रावतेंच्या पुढाकाराने शेतकरी कुटुंबातील मुलांना नोकरी मिळणार आहे.
परिवहन खात्यातल्या भरतीच्यावेळी आपण असा प्रस्ताव तयार केला होता आणि मंजुरीसाठी पाठवल्याची माहिती रावतेंनी दिली.
आता मुख्य सचिवांकडून परिवहन मंत्र्यांच्या प्रस्तावाला मान्यता मिळाली. त्यामुळे परिवहन खात्याप्रमाणेच सर्व खात्यामध्ये गट क श्रेणीत नोकरी देण्यात येणार आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.