पावसाळा सुरु झाल्यापासून मुंबईतील अनेक रस्त्यांवर खड्यांचे साम्राज्य पसरले आहे. महापालिकेने मुंबईत यंदा खड्डे कमी असल्याचा दावा केला असला,तरी खड्डे बुजवण्याची खर्च मात्र वाढलेला आहे. पालिकेने शहर व पूर्व पश्चिम उपनगरातील खड्डे बुजवण्यासाठी तब्बल ३६ कोटींच्या निविदा मागविल्या होत्या.
गेल्या अनेक वर्षांपासून मुंबईमध्ये पावसाळ्यात रस्त्यांवर पडणारे खड्डे ही मुंबईकरांसाठी मोठी डोकेदुखी बनली आहे. दरवर्षी रस्ते दुरुस्तीसाठी हजारो कोटी रुपये खर्च केल्यानांतरही खड्यांची समस्या जैसेथे आहे. या वेळेसही परिस्थिती काही वेगळी नाही.
नवी मुंबईतील ऐरोली टोल नाक्याजवळ खड्यांचे साम्राज्य पसरले असून नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. टोल नाक्याशेजारीच हे भले मोठे खड्डे पडले असले तरी टोल वसुली मात्र अविरत सुरूच असल्याने या विरोधात मनसे आक्रमक झाली .ऐरोली टोल प्रशासनाची भेट घेत मनसेच्या शिष्टमंडळाने टोल अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले. यावेळी आठवडा भरात खड्डे बुजवा अन्यथा कायदा हातात घेऊ असा इशारा मनसे तर्फे देण्यात आला.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.