‘वक्तव्याचा विपर्यास केलाय’

‘वक्तव्याचा विपर्यास केलाय’

विधिमंडळाच्या हक्कभंग नोटिशीला उद्धव गटाचे खासदार संजय राऊत यांनी उत्तर दिले आहे. “माझ्या विधानाचा विपर्यास करण्यात आला” असा दावा त्यांनी केला आहे.

“मी मुंबई बाहेर असताना या विधानाचा विपर्यास करण्यात आला. हे विधान विधीमंडळातील सदस्यांचा अवमान करण्याकरता केले नव्हते. ते एका विशिष्ट गटापुरते मर्यादित होते. विधीमंडळाच्या भावना दुखावण्याचा माझा कोणताही हेतू नव्हता आणि यापुढेही नसणार. मी केलेले विधान तुम्ही तपासू पाहावे”, असे संजय राऊत बुधवारी ( ८ मार्च ) म्हणाले आहेत.
सोमवारी ( २७ फेब्रुवारी ) राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु झाले. या अधिवेशनाच्या तिसऱ्या दिवशी, बुधवारी ( १ मार्च ) विधानसभेत उद्धव गटाचे खासदार संजय राऊत यांच्या विरोधातही हक्कभंग प्रस्तावाची मागणी करण्यात आली होती. बुधवारी  ( १ मार्च ) कोल्हापुरात “हे विधिमंडळ नाही तर चोरमंडळ आहे”, असे विधान संजय राऊत यांनी केले होते. त्यामुळे, सर्वच पक्ष संजय राऊतांविरोधात आक्रमक झाले होते. यानंतर संजय राऊतांच्या विरोधात हक्कभंग प्रस्ताव मंजूर झाला. पुढे या प्रकरणी वेगवान घडामोडी होत विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी १५ सदस्यांची हक्कभंग समिती स्थापन केली गेली होती.या समितीकडून मिळालेल्या नोटिसीवर संजय राऊत यांनी आता स्पष्टीकरण दिले आहे.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version