महाराष्ट्राच्या राजकारणात सत्तासंघर्षानंतर आता अजित पवारांच्या सत्तांतराने चांगलीच खळबळ माजली आहे. अजित पवारांसह ९ आमदारांनी केलेल्या बंडाविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने पावलं उचलायला सुरुवात केली आहे. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी विधानसभा अध्यक्षांकडे अपात्रतेची याचिका दाखल केल्याचं स्पष्ट केलं.
काय म्हणाले जयंत पाटील?
”तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने अपात्रतेची याचिका विधानसभेच्या अध्यक्षांकडे दाखल केली आहे. यासंबंधी ईमेलवर तक्रार पाठवली असून फिजिकल कॉपी पाठवत आहे. ती त्यांना काही तासांमध्ये मिळेल. शिवाय मी स्वतः चार वेळा नार्वेकरांना संपर्क साधण्याचा प्रय़त्न केला असून हे पीटीशन व्हॉट्सअपवर पाठवलेलं आहे”, असं जयंत पाटील यांनी सांगितलं. राहुल नार्वेकर यांच्याकडे आम्ही मागणी केली आहे की, उद्या या पीटीशनसंदर्भात हेअरिंग घेऊन आमची बाजू ऐकून घ्यावी. निवडणूक आयोगालाही याबाबत कल्पना दिलेली आहे. महाराष्ट्रातल्या जवळपास सर्वच जिल्ह्यातील कार्यकर्ते शरद पवार यांच्यासोबत आहेत. त्यांना पवार साहेबांच्या नेतृत्वाचं समर्थन केलेलं आहे. ९ आमदार ही पार्टी होऊ शकत नाही. त्यांनी केलेली कृती राज्य आणि राष्ट्रीय अध्यक्षांना न सांगता केलेली आहे. त्यामुळे राहुल नार्वेकर यांनी याबबात आम्हांला लवकरात लवकर बोलवावं, ही आमची मागणी आहे, असं जयंत पाटील म्हणाले.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.