पनीरचे तोटे

पनीरचे तोटे

पनीर आणि पनीरचे पदार्थ आपण आवडीने खातो. शाकाहारी लोकांसाठी तर पनीर म्हणजे मेजवानीच आहे.पनीर आरोग्यसाठी फायदेशीर देखील असते. कारण त्यात भरपूर प्रथिने आढळतात. याशिवाय पनीरमध्ये कॅल्शिअम , फॉस्फरस, सेलेनियम फायबर आणि अँटीऑक्सिडंट हे गुणधर्म आढळतात. त्यामुळे पनीर खाल्याने हाडे मजबूत होतात.परंतु पनीरचे जसे फायदे आहेत तसेच तोटे देखील आहेत.

पनीर खाण्याचे तोटे ?

पनीर हा प्रोटीनचा चांगला स्रोत मानला जातो, परंतू शरीरात प्रथिनांचे प्रमाण जास्त असल्यास पनीर खाल्याने डायरियाची समस्या उद्भवू शकते. म्हणून एकाच वेळी जास्त प्रमाणात पनीर खाऊ नये.


पनीरमध्ये फॅट भरपूर प्रमाणात असते .त्यामुळे पनीर खाल्याने कोलेस्ट्रॉलचे प्रमाण वाढू शकते, ज्यामुळे हृदयाशी संबंधित आजार उद्भवू शकतात.


लॅक्टोज इनटॉलरन्ट असणाऱ्या व्यक्तीने पनीरचे सेवन केल्यास ॲलर्जी होऊ शकते. पनीरमध्ये लॅक्टोस कमी प्रमाणात असते परंतु सावधगिरी म्हणून त्याचे कमी प्रमाणातच सेवन करावे.


आहारात पनीरचे प्रमाण जास्त झाल्याने पचनाशी संबंधित समस्या उद्भवू शकतात.त्यामुळे पोटात सूज येऊ शकते. तसेच छातीत जळजळ आणि ओटीपोटात तीव्र वेदना होऊ शकतात.


पनीरचे अति प्रमाणात खाल्यास वजन वाढू शकते. जर तुम्हाला वजन कमी करायचे असेल तर आहारात पनीरचा समावेश कमी ठेवावा. जर तुम्हाला उच्च रक्त दाबाची समस्या असेल तर पनीरचे जास्त सेवन करू नका.


पनीर बनवण्यासाठी वापरलेले दूध पाश्चराइज्ड नसल्यास किंवा पनीर कच्चे खाल्ल्यास बॅक्टेरियाचा संसर्ग होण्याची शक्यता वाढते.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version