नेमबाजीमध्ये दीपक कुमारची ‘रौप्य’ कामगिरी

नेमबाजीमध्ये दीपक कुमारची ‘रौप्य’ कामगिरी

वृत्तसंस्था, नवी दिल्ली

एशियन गेम्स 2018 मध्ये नेमबाज दीपक कुमारने सोमवारी 10 मीटर एयर रायफलमध्ये रौप्य पदक जिंकले आहे. भारताने यंदाच्या अशियाई स्पर्धेत प्राप्त केलेले हे तीसरे पदक आहे.

चीनच्या नेमबाजांनी बाजी मारली असली, तरी दीपक कुमारनेे रौप्य कामगिरी केली आहे.

चीनच्या होरोनने 249.1 गुणांसह सुवर्णपदक पटकावले आहे. तर दिपकने 247.7 या गुणांची कमाई करत रौप्यपदक पटकावले आहे.

याआधी रविवारी अपूर्वी आणि रवी यांच्या जोडीनेही 10 मीटर एयर रायफल मिक्स इवेंटमध्ये भारताला कांस्य पदक मिळवून दिले होते.

2 मालिकांनंतर भारताचा रवी कुमार 103.3 अंकासह तीसऱ्या आणि दीपक कुमार पाचव्या पोजिशनवर होते.

तिसऱ्या मालिकेमध्ये रवी कुमारपेक्षा दीपक कुमारने वरचढ कामगिरी करत रौप्य पदकाची कमाई केली.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version