अजूनही मार्च महिना सुरू झाला नसला तरी तापमानाचा पारा चांगलाच वाढला आहे. धुळे शहरातील तापमानाचा पारा ३६ अंशावर गेला आहे. गेल्या काही दिवसापासून तापमानात सतत वाढ होत चालली आहे. त्यामुळे धुळे शहरातील रस्ते भर दुपारी निर्मनुष्य होत आहेत. धुळे शहरात सकाळी ८ ते १० अंश सेल्स तापमान असते. दुपारी हे तापमान थेट ३६ अंशाच्या वर जाऊ लागले आहे. गेल्या आठवड्याभरात ५ अंशाने तापमान वाढले आहे. वाढलेल्या तापमानामुळे शहरातील प्रमुख रस्ते निर्मनुष्य होत आहेत. उन्हापासून संरक्षण व्हावे यासाठी नागरिक टोपी रुमाल स्कार्फचा वापर करताना दिसून येत आहेत. येणाऱ्या काही दिवसात तापमानात आणखी वाढ होण्याची शक्यता वर्तली जात आहे.
देशाच्या अनेक भागांमध्ये आधीच अधिक तीव्रतेच्या तापमानाची नोंद होत आहे. साधारणपणे एवढे तापमान मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यात नोंदवण्यात येते. त्यामुळे यंदाच्या वर्षी तीव्र उष्णतेची लाट येण्याची चिंता व्यक्त केली जात आहे. या काळात अधिक तापमान उत्पादनासाठी हानिकारक आहे. इतर उभी पिके आणि फळबागांवरही असाच परिणाम होऊ शकतो. हवामान खात्याने सांगितले की, पिकांवर उष्णतेचा परिणाम दिसू लागल्यास शेतकरी हलके सिंचन करू शकतात.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.