टीका सहन होत नसेल तर सत्ता सोडा; धनंजय मुंडेंची भाजपवर टीका

टीका सहन होत नसेल तर सत्ता सोडा; धनंजय मुंडेंची भाजपवर टीका

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

सरकारविरोधात सोशल मीडियावर टीका करणाऱ्यांना चौकशीच्या नोटीसा ही अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी आहे असा आरोप राष्ट्रवादीचे आमदार धनंजय मुंडेंनी केला आहे.

 

फेसबुकवर मुख्यमंत्र्यांविरोधात वादग्रस्त टिप्पणी करण्यात आली. टिप्पणी करणाऱ्याच्या फेसबुकवरील 27 तरुणांना नोटीसा पाठवण्यात आल्यात.

 

मुंबई सायबर सेलच्या पोलिसांनी या नोटीसा बजावल्यात. त्यात पत्रकार ब्रह्मा चट्टे यांचाही समावेश आहे. यावर धनंजय मुंडेंनी ट्विटरवर टीका केली.

 

धनंजय मुंडे नेमकं काय म्हणालेत 

 

– सोशल मीडियावरच्या टीकेनं सरकारच्या अस्तित्वाला धक्का दिलाय. त्यांची पोलखोल झाली आहे. अशा पोलीस चौकशीचा ससेमीरा हा आणीबाणीपेक्षा भीषण आहे

– सरकारची पत्रकारांवर पाळत होती, आता पोलीस पत्रकारांना चौकीत बोलवून धमकावत आहेत. माध्यमांवरचा घाला हा लोकशाहीवरचा हल्ला आहे.

– टीका सहन होत नसेल तर सत्ता सोडा, टीका करणं हा पत्रकारांचा धर्म आहे. त्यांच्या मागे पोलीस लावण्याचा अर्थ सरकारचं अस्तित्व डळमळीत झालं आहे.

– पोलिसांनी निवडून पत्रकारांना बोलावणं आणि चौकशीच्या नावाखाली धमकावणं, ही दुसऱ्या आणीबाणीची चाहूल आहे.

– पत्रकारांना धमकावणं सरकारला महागात पडेल.

– ब्रह्मा चट्टे आणि इतरांना नोटीसा पाठवणाऱ्या सरकारनं लक्षात घ्यावं की त्यांनी कितीही कोंबडं झाकले तरी जनआक्रोशाचा सूर्य उगवल्याशिवाय राहणार नाही.

– राज्यातील महागाई, बेरोजगारी आणि मंत्र्यांचे भ्रष्ट्राचार या विरुद्धचा जनआक्रोश दडपून टाकण्यासाठी राज्य सरकार कडून पोलिसी बळाचा गैरवापर सुरू

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version