औरंगाबादमध्ये धनंजय मुंडेंनी सुरु केले अमित शाह वडापाव सेंटर; मुंडेनी स्वत: तळले भजी

औरंगाबादमध्ये धनंजय मुंडेंनी सुरु केले अमित शाह वडापाव सेंटर; मुंडेनी स्वत: तळले भजी

जय महाराष्ट्र न्यूज, औरंगाबाद

 

सर्वसामान्य माणसांचं खाद्यान्न म्हणजे वडापाव आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी देखील एक वडापावची गाडी सुरू केलीये.

या वडपावच्या गाडीचं नाव आहे. अमित शाह वडापाव सेंटर. काही दिवसांपुर्वी भाजपा अध्यक्ष अमित शाह यांनी बेरोजगारांनी पकोडा विकावा असं वक्तव्य केलं होते.

याला प्रत्योत्तर देत रविवारी औरंगाबादमधिल सिडको परिसरात भजी पावची गाडी काढलीये. यावेळी देशात जर कोणाच्या मुलाचा सर्वाधीक फायदा झाला असेल तर तो अमित शाह यांच्या मुलाचा झालाय. ज्या बेरोजगारांनी मोदींना निवडून दिलंये.

त्यांचाच अमित शाह अवमान करातात. त्यामुळे तेच बेरोजगार त्यांना खाली खेचल्याशिवाय राहणार नाही अशी टीका मुंडे यांनी केलीये.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version