‘सकारची ही कर्जमाफी फसवी’ – धनंजय मुंडे

‘सकारची ही कर्जमाफी फसवी’ – धनंजय मुंडे

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

साडेतीन वर्षांपासून मोदी पॅटर्नमुळे राज्यात नीरव शांतता असल्याचा खोचक टोला विरोधी पक्षनेत्यांनी लगावलाय. राज्यात सरकारमुळे होणाऱ्या चुकांचा सामान्य नागरिकांना फटका बसत असून सरकारला ही शेवटची संधी असल्याचं त्यांनी म्हटलयं.

धर्मा पाटलांच्या मुद्द्यांवर बोलतांना सरकार आणि दलालांनी ही हत्या केल्याचा आरोप विरोधी पक्षानं केलाय.

हल्लाबोल आंदोलन करताना एकही लाभार्थी शेतकरी सापडला नाही. त्यामुळे सकारची ही कर्जमाफी फसवी असल्याचं धनंजय मुंडे म्हणालेत.

9 मार्चला राज्याचा अर्थसंकल्प मांडला जाणार आहे. या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर विरोधी पक्षातील गटनेत्यांची पत्रकार परिषद झाली होती.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version