भाजपला अजूनही शिवाजी महाराज कळलेच नाही; शिवरायांच्या वंशजाबाबत वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या भाजप नेत्याचा धनंजय मुंडेंनी घेतला समाचार

भाजपला अजूनही शिवाजी महाराज कळलेच नाही; शिवरायांच्या वंशजाबाबत वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या भाजप नेत्याचा धनंजय मुंडेंनी घेतला समाचार

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

राष्ट्रवादी काँग्रेसच्या ‘हल्लाबोल’ आंदोलनाचा दुसरा टप्पा 16 तारखेपासून सुरु होणार आहे. अशी माहिती विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे यांनी दिलीये. मराठवाड्यातील विविध प्रश्नांवर होणाऱ्या हल्लाबोल मोर्चाच्या तयारीसाठी मुंडे हिंगोलीत आले असतांना त्यांनी ही माहिती दिली.

यावेळी त्यांनी शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयचं उदघाटनही केलं. त्यानंतर बोलतांना त्यांनी भाजप नेते श्याम जाजूंच्या वादग्रस्त वक्तव्याचा खरपूस समाचारही घेतला.

शिवाजी महाराजांच्या वंशजावर हिरे विकण्याची वेळ आली होती असं विधान जाजूंनी केलं होतं. यावर बोलतांना भाजपला शिवाजी महाराज अद्याप कळलेच नाहीत, धार्मिक तेढ निर्माण करण्यात त्यांना रस आहे अशी कोपरखळी मुंडेंनी भाजपला मारली. 

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version