‘सरकारने मराठी भाषेचा अवमान केला आहे’ – धनंजय मुंडे

‘सरकारने मराठी भाषेचा अवमान केला आहे’ – धनंजय मुंडे

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

सोमवारपासून राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात झाली. राज्यपाल सी विद्यासागर राव यांनी शेतकरी कर्जमाफी आणि सरकारच्या विविध योजनांबद्दल आपल्या अभिभाषणात माहिती दिली. मात्र, हे भाषण इंग्रजी होते. आणि त्याचा अनुवादही मराठीत नव्हता, त्यामुळे विरोधक चांगलेच आक्रमक झालेत. त्यावर  विरोधी पक्षनेते धनंजय मुंडेंनी ट्विट केले आहे.

राज्यपालांचे अभिभाषण मराठीत अनुवादित न करून  सरकारने मराठी भाषेचा अवमान केला आहे. मराठी विरोधी सरकारचा निषेध करण्यासाठी आम्ही राज्यपालांच्या अभिभाषणावर बहिष्कार टाकून सभात्याग केला. विधानभवनातील शिवरायांच्या प्रतिमेजवळ सरकार विरोधी घोषणा देऊन सरकारचा धिक्कार केला.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version