जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई
राज्य सरकारला जवळपास तीन वर्षे पूर्ण होत आहे. मात्र, सरकारचा सर्व कारभार हा गोल-गोल असून त्यात मोठा झोल-झोल आहे अशी खरमरीत टीका विरोधी पक्षनेते
धनंजय मुंडे यांनी केली.
तसेच तूरडाळ व्यापऱ्यांनी शेतकऱ्यांच्या नावाने घोटाळा केला, असं स्वत: मुख्यमंत्र्यांनी सांगितले. त्यावर चौकशीही लावली मग, त्या चौकशीचं पुढे काय झालं? असा
सवाल धनंजय मुंडे यांनी विचारला.
शिवसेनेला काही काळ शेतकऱ्यांच्या बाबतीत कळवळा आला होता. यासाठी शिवसेनेनं ढोल वाजवून आंदोलन केलं होते. मात्र, आता शिवसेनेसमोर ढोल वाजवण्याची वेळ
आली असल्याची टीका देखील मुंडेंनी केली.
3 वर्षांपूर्वी जनतेने डोक्यावर घेऊन या सरकारला आणले. मात्र, आता हीच जनता सरकारवर नाराज आहे. त्यामुळे या जनतेच्या मुद्द्यावरून आम्ही सरकारच्या
चहापानाच्या कार्यक्रमावर बहिष्कार घालत असल्याचे धनंजय मुंडे म्हणाले.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.