…जेव्हा धनंजय मुंडे क्रिकेट खेळतात तेव्हा

…जेव्हा धनंजय मुंडे क्रिकेट खेळतात तेव्हा

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

एरव्ही सत्ताधाऱ्यांना कोंडीत पकडणारे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे चक्क क्रिकेटचा आनंद लुटतांना दिसले.

परळीच्या तहसील कार्यालयासमोर सुरु असलेल्या सरपंच चषकदरम्यान धनंजय मुंडे मैदानात उतरले होते. राष्ट्रवादीच्या परळी-ग्रामीण आणि परळी-शहरी असा हा सामना रंगला होता.

यावेळी धनंजय मुंडे परळी ग्रामीण संघाकडून खेळत होते. ओपनिंगला उतरलेल्या धनंजय मुंडेंनी 30 धावांची कमाई केली.

धनंजय मुंडेचा खेळ पाहण्यासाठी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांसह परिसरातील लोकांनीही मोठी गर्दी केली होती.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version