…म्हणून कोरेगाव-भीमा घटना घडली – धनंजय मुंडे

…म्हणून कोरेगाव-भीमा घटना घडली – धनंजय मुंडे

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

विधानपरिषद विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे परभणी दौऱ्यावर गेले असता त्यांनी राष्ट्रवादी भवनात पत्रकार परिषद घेतली. येत्या 22 जानेवारीला परभणीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने हल्लाबोल आंदोलन करण्यात येणार आहे.

आंदोलनाच्या दुसऱ्या टप्प्याच्या तयारी संदर्भात पाहणी करण्यासाठी आले असता मुंडेंनी ही पत्रकार परिषद घेतली. दरम्यान 22 तारखेला राष्ट्रवादीचे सर्व नेते तसंच मराठवाड्यातील नेते उपस्थित राहणार असल्याचंही ते यावेळी म्हणाले.

तसंच धनंजय मुंडे यांनी कोरेगांव भिमा प्रकरणावरही भाष्य केलंय. भीमा कोरेगाव प्रकरण म्हणजे सरकार आणि गृह विभागाचे अपयश आहे आणि म्हणून भीमा कोरेगाव घटना घडली.

घटना घडवून आणली अस मुख्यमंत्री म्हणतात बाहेरच लोकांनी घडवली तशी माहिती गृह विभागाकडे होती तर गृह विभाग गप्प का राहिला असा प्रश्न यावेळी मुंढेंनी उपस्थित केला.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version