देवेंद्र फडणवीस अमरावती दौऱ्यावर  

देवेंद्र फडणवीस अमरावती दौऱ्यावर  

  त्रिपुरा हिंसाचार घटनेचे तीव्र पडसाद महाराष्ट्रात उमटले आहेत. त्रिपुरा येथील धार्मिक स्थळावर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ मुसलमान संघटनांच्या आंदोलनाला हिंसक वळण लागले. त्यामुळे अमरावतीमधील तणावग्रस्त परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी अमरावतीमध्ये संचारबंदी लागू करण्यात आली. याच पार्श्वभूमीवर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस अमरावती दौऱ्यावर आले आहेत.

  त्रिपुरा येथील कथित प्रकरणानंतर त्याचे पडसाद म्हणून अमरावती शहरात हिंसाचार घडून आला होता. यात अनेक दुकानांची तोडफोड तसेच व्यापाऱ्यांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. याच पार्श्वभूमीवर या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस आज अमरावतीत दाखल झाले आहेत. हिंसाचारानंतर अमरावतीत प्रथमच राजकीय नेत्यांचा दौरा सुरु झाला आहे.

  देवेंद्र फडणवीस अमरावती दौऱ्यावर असून रझा अकादमीच्या हिंसाचारात होरपळलेल्यांचे सांत्वन करणार आहेत. अमरावतीमधील बंदला हिंसक वळण लागल्यामुळे तेथे संचारबंदी लागू करण्यात आली. मात्र आता रझा अकादमीच्या दंगलीनंतर अमरावती हळूहळू पूर्वपदावर आहे. अमरावतीमधील संचारबंदीत शिथिलता आणली असून इंटरनेट सेवा मात्र बंदच आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version