‘समृद्धीवरील अपघातग्रस्त ‘देवेंद्र’वासी होतो…’

‘समृद्धीवरील अपघातग्रस्त ‘देवेंद्र’वासी होतो…’

बुलढाणा येथील येथील समृद्धी महामार्गावर प्रवासी बसला भीषण आग लागल्याची घटना उघडकीस आली आहे. या आगीत २५ जणांचा होरपळून मृत्यू झाल्याची भिती व्यक्त केली जात आहे. तर, बुलढाण्यातील भीषण अपघातानंतर राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे.

काय म्हणाले शरद पवार?

‘समृद्धी महामार्गावर जो अपघातात मृत्यू पावतो तो ‘देवेंद्र’वासी होतो असे लोक सांगतात’, असं म्हणत शरद पवारांनी फडणवीसांवर निशाणा साधला आहे. अपघातावर प्रतिक्रिया देताना पवार म्हणाले की, ”समृद्धी महामार्गावर अनेक अपघात झालेत. हे अपघात सातत्याने होत आहेत. हे चित्र गेले काही महिने बघायला मिळत आहे. मी त्या रस्त्याने गेलो होतो. तिथे लोकांना त्यांचा अनुभव विचारला. लोक म्हणाले सातत्याने अपघात बघायला मिळतात. जो अपघातात मृत्यू पावतो तो देवेंद्र वासी होतो असे लोक सांगतात”, अशा शब्दात शरद पवार यांनी बुलढाण्यातील अपघातावरुन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर निशाणा साधला आहे. ते पुण्यातील पत्रकार परिषदेत बोलत होते.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version