जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यभरात राजकीय हालचालींना वेग आला असून नेत्यांच्या सभा सुरू आहेत. अशातच एक अत्यंत महत्त्वाची आणि खळबळजनक बातमी समोर आली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमानाला अपघात झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. ही घटना बारामतीतील गोदापाली परिसरात घडल्याची माहिती समोर येत असून, सकाळी सुमारे 9 वाजण्याच्या सुमारास विमानाचं लँडिंग होत असताना हा अपघात झाल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार हे पुण्यातून बारामतीकडे रवाना झाले होते. बारामतीत आज त्यांची निवडणूक सभा आयोजित करण्यात आली आहे. या अपघातात काही जण जखमी झाल्याची माहिती मिळत असून, घटनास्थळी तात्काळ मदतकार्य सुरू करण्यात आलं आहे. सुदैवाने अजित पवार सुरक्षित असल्याची प्राथमिक माहिती सूत्रांकडून देण्यात येत आहे.
दरम्यान, अपघात नेमका कशामुळे झाला, विमानात एकूण किती जण होते आणि जखमींची प्रकृती कशी आहे, याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती प्रशासनाकडून जाहीर करण्यात आलेली नाही. संबंधित यंत्रणा घटनास्थळी दाखल झाल्या असून पुढील तपास सुरू आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.