जय महाराष्ट्र न्यूज, कोल्हापूर
पुण्यातल्या डीसके ग्रुपने कोल्हापुरातल्या गुंतवणूकदारांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आलाय. इथल्या जवळपास 600 गुंतवणूकदारांची 200 कोटींचा जादा परतावा देण्याच्या आमिषाने फसवणूक केल्याचा आरोप आहे. याप्रकरणी ते फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्याच्या तयारीत आहेत. गेल्या आठ महिन्यांपासून परतावा दिला गेला नसल्याचं गुंतवणूकदारांनी सांगितलं. दरम्यान, याप्रकरणात मुख्यमंत्र्यांनीच लक्ष घालण्याची मागणीही गुंतवणूकदारांनी केली आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.