नागपूरात डासांचा प्रकोप दिवसेंदिवस वाढत असुन डेंग्यूच्या रुग्णांत देखील मोठी वाढ झाली आहे, यात विशेष म्हणजे नागपूर शहरातील शाळा तपासणी मध्ये 29 शाळांमध्ये देखील डेंगूच्या अळ्या आढळून आल्याने शालेय विद्यार्थ्यांना देखील डेंगूच्या सर्वाधिक त्रास होत आहे.
नागपूर महानगरपालिकेच्या शाळांसोबतच अनेक खाजगी शाळेत केलेल्या सर्वक्षणात गेल्या 2 महिन्यात 29 शाळांमध्ये डेंगूच्या अळ्या आढळून आल्या आहेत. यासंदर्भात शाळांना नोटीस पालिकेतर्फे बाजवण्यात आले असून शाळेतील कुलर, आणि पाणी जमा होणाऱ्या जागा कोरड्या ठेवण्याच्या सूचना शाळांना केल्या आहेत.
जानेवारी ते ऑगस्ट च्या दरम्यान 69 रुग्णांना डेंग्यूची लागण झाली असून यात 15 वर्षपेक्षा कमी वयाच्या मुलांचा मोठा समावेश आहे. मोठमोठाल्या फी आकारणाऱ्या शाळा मात्र या बाबतीत उदासीन असून विद्यार्थांना डेंगूची लागण होण्याची शक्यता जास्त आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.