मुंबईतील डेंग्यू रुग्णांत 265 टक्के वाढ तर टीबीमुळे रोज 18 जणांचा मृत्यू

मुंबईतील डेंग्यू रुग्णांत 265 टक्के वाढ तर टीबीमुळे रोज 18 जणांचा मृत्यू

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

प्रजा फाऊंडेशननं तयार केलेल्या मुंबईच्या हेल्थ रिपोर्टमध्ये अतिशय धक्कादायक वास्तव समोर आलं. गेल्या पाच वर्षात डेंग्यूच्या रुग्णांमध्ये तब्बल 265 टक्क्यांनी वाढ झाली.

 

2012-13 मध्ये डेंग्यूचे अवघे 4 हजार 867 रुग्ण होते. मात्र आज डेंग्यूच्या रुग्णांची संख्या तब्बल 17 हजार 771 वर पोहोचली. टीबीचे रुग्णही शहरात झपाट्यानं वाढताना दिसत आहेत.

 

प्रजा फाऊंडेशनच्या अहवालानुसार मुंबईत टीबीमुळे दररोज 18 जणांचा मृत्यू होतो. त्याशिवाय डायबेटिस, हायपरटेन्शन आणि इतर आजारांमुळे मुंबईकर अधिक बेजार झालेत.

 

प्रजा फाऊंडेशनच्या अहवालातील माहिती-

गेल्या पाच वर्षात डेंग्यूच्या रुग्णांमध्ये तब्बल 265% नी वाढ

2012-13 मध्ये 4 हजार 867 रुग्ण आढळले

2016-17 मध्ये ही संख्या 17 हजार 771 वर

डेंग्यूमुळे मृत झालेल्यांची संख्या 77 वरुन 148 वर

2015-16 मध्ये 5 हजार 400 टीबीचे बळी

2016-17 मध्ये 6 हजार 472 जणांचे टीबीमुळे मृत्यू

बदलत्या जीवनशैलीमुळे मुंबईतल्या डायबिटीस आणि

हायपरटेन्शनच्या रुग्णांमध्येही मोठी वाढ

2016-17 मध्ये डायबिटीसमुळे 2 हजार 675 मृत्यू

हायपरटेन्शनमुळे तब्बल 4 हजार 438 मृत्यू झालेत

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version