‘भारतात लोकशाही, म्हणूनच समता’

‘भारतात लोकशाही, म्हणूनच समता’

‘जात, पंथ किंवा धर्माच्या आधारावरील भेदभावास भारतात जागा नाही,’ अशी स्पष्टोक्ती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमेरिकी प्रसारमाध्यमांसमोर केली. मुस्लिम आणि इतर अल्पसंख्याकांच्या अधिकारांमध्ये सुधारणा करण्यासाठी सरकार उचलत असलेल्या पावलांबद्दल एका अमेरिकन पत्रकाराने विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हे स्पष्ट केले. राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांच्यासमवेत संयुक्त पत्रकार निवेदनादरम्यान ‘लोकशाही आमच्या नसानसांमधून वाहते,’ असेही पंतप्रधान म्हणाले.

भारतातील अल्पसंख्याकांच्या अधिकारांमध्ये सुधारणा करण्यासाठी कोणत्या उपाययोजना करण्यास तुमचे सरकार इच्छुक आहे, असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला. तेव्हा मोदी यांनी ‘भारताचा सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास, सबका प्रार्थना यावर विश्वास आहे आणि त्याच वाटेवरूनच आम्ही चालतो. म्हणून, जेव्हा लोक असे म्हणतात की अल्पसंख्याकांविरुद्ध भेदभाव होतो आहे, तेव्हा मला खरोखर आश्चर्य वाटते. भारत ही खरी लोकशाही आहे. लोकशाहीत भेदभावाला जागा नसते आणि भारत सर्वांना बरोबर घेऊन पुढे जाण्यावर विश्वास ठेवतो, ’ असे ठाम प्रतिपादन पंतप्रधानांनी केले.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version