जीएसटीची अंमलबजावणी आणि मनी लाँड्रिंग प्रतिबंधक कायद्यामुळे सोन्याच्या मागणीत घट

जीएसटीची अंमलबजावणी आणि मनी लाँड्रिंग प्रतिबंधक कायद्यामुळे सोन्याच्या मागणीत घट

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

2017मध्ये सोन्याची मागणी सातत्याने घटत असून, ती आठ वर्षांच्या नीचांकी पातळीवर जाईल, असे दिसून येत आहे. सोन्याच्या खरेदी-विक्री व्यवहारात अधिक पारदर्शकता आणण्यासाठी सरकारने केलेल्या उपाययोजना आणि ग्रामीण भागात घसरलेली मागणी याचा हा परिणाम असल्याचे जागतिक सुवर्ण परिषदेने म्हटलंय.

सोने वापराच्या बाबतीत भारत हा जगात दुसऱ्या क्रमांकावर आहे. पहिल्या क्रमांकावर चीन आहे. जागतिक सुवर्ण परिषदेचे व्यवस्थापकीय संचालक सोमसुंदरम् पीआर यांनी दिलेल्या माहितीनुसार 2017मध्ये भारतातील सोन्याची मागणी 650 टन राहण्याची शक्यता आहे. गेल्या 10 वर्षांतील सरासरी मागणी 845 टन आहे. जीएसटीची अंमलबजावणी आणि मनी लाँड्रिंग प्रतिबंधक कायद्यामुळे सप्टेंबरला संपलेल्या तिमाहीत सोन्याच्या मागणीत मोठी घट झाली आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version