व्हीआयपी दर्शन सशुल्क करण्याची मागणी

व्हीआयपी दर्शन सशुल्क करण्याची मागणी

पंढरपूर, १७ मे २०२३, प्रतिनिधी : पंढरपूरात विठ्ठल– रूख्‍मीणीच्‍या दर्शनासाठी भाविकांची वर्षभर गर्दी असते. आषाढी यात्रेदरम्‍यान तर भाविकांचा जनसागरच लोटलेला असतो. यामुळे रांगेत उभे राहून दर्शन घ्यावे लागत असते. या गर्दीत न जाता विठ्ठलाचे दर्शन चांगल्‍या प्रकारे करता यावे; याकरीता व्‍हीआयपी रांगेची सुविधा आहे. परंतु, या रांगेतील भाविकाला व्‍हीआयपी दर्शनासाठी शुल्‍क आकारावे; अशी मागणी होत आहे.

मंदिराच्‍या उत्‍पन्‍न वाढीसाठी..

व्‍हीआयपी दर्शनासाठीचे शुल्‍क हे मंदिराच्या उत्पन्न वाढीसाठी आकारावे, अशी वारकरी सांप्रदायाने केलेली प्रमुख मागणी आहे. व्हीआयपी दर्शनाला शुल्क सुरू झाल्यास कोट्यवधी रुपयांचे उत्पन्न मिळणार असून या शुल्‍कातील रक्‍कमेतून भाविकांना सुविधा देण्याकडे मंदिर प्रशासनाचा कल असावा. व्हीआयपी सशुल्क दर्शनाबाबत वारकरी सेवा संघाच्या हभप ज्ञानेश्वर महाराज जोगदंड यांनी मागणी केली आहे. तसेच मागणी मान्य न झाल्यास तीव्र आंदोलन करणार असल्याचा जोगदंड महाराजांनी म्‍हटले आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version