प्लॅटफॉर्मवर मुलगा झाला हो!

प्लॅटफॉर्मवर मुलगा झाला हो!

जय महाराष्ट्र न्यूज, ठाणे

 

ठाणे रेल्वे स्टेशनवरची नेहमीची गर्दी थोडी थबकली होती. प्लॅटफॉर्म क्रमांक दहावर सगळ्यांचंच लक्ष लागून राहिलं होतं. अचानक त्या गर्दीतून बाळाच्या रडण्याचा परिचित आवाज आला. आणि गर्दीच्या चेहऱ्यावर हसू उमटलं. कारण ठाण्याच्या प्लॅटफॉर्मवरच एका गोंडस मुलाचा जन्म झाला होता.

 

बदलापूरला राहणारी जान्हवी जाधव ही महिला ठाणे रेल्वे स्टेशनवर उतरली. तेव्हा तिला तिथेच प्रसुती कळा सुरु झाल्या. सुदैवानं महिला पोलीस कॉन्स्टेबल शोभो मोटे आणि एक प्रवासी नर्स तिथे होती. या दोघींनी अधिकाऱ्यांच्या साथीनं रेल्वे प्लॅटफॉर्मवरच प्रसुती केली. बाळ आणि बाळंतीणीची प्रकृती ठिक असून त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version