भीमा कोरेगाव हिंसाचारातील नक्षली संबंधाच्या आरोपावरुन नजरकैदेत असणारे मानवाधिकार कार्यकर्ते आणि पत्रकार गौतम नवलखा यांची नजरकैदेतून मुक्तता करण्याचे आदेश दिल्ली हायकोर्टाने दिले आहेत. दिल्ली हायकोर्टाच्या निर्णयामुळे नवलाखा यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
नवलखा यांना २४ तासापेक्षा अधिक वेळ ताब्यातघेणे योग्य नसल्याचेही हायकोर्टाने म्हटले. न्या. मुरलीधर आणि न्या. गोयलयांच्या खंडपीठाने मुख्य महानगर दंडाधिकारी यांच्या आदेश रद्द केले. महानगरदंडाधिकारी न्यायालयाचे आदेश कायदेशीरदृष्टया अयोग्य असल्याचे नमूद केले.
कोण आहेत गौतम नवलखा?
गौतम नवलखा हे मानवाधिकार कार्यकर्ते आहेत.
तसेच ते पत्रकारही आहेत.
‘इकोनोमिक अँड पोलिटिकल वीकली’ या नियतकालिकाचे ते संपादकीय सल्लागारही आहेत.
जम्मू-काश्मिरमधील मानवाधिकारांबद्दल त्यांनी अनेकदा लिखाण केलं आहे,
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.