Delhi Crime: पतीचे अनैतिक संबंध, गर्भवती असताना अत्याचार… फोन वापरण्यासही बंदी; दिल्लीतील नामांकित उद्योगपतीच्या सुनेनं उचललं टोकाचं पाऊल

दिल्लीतील वसंत विहार येथे उद्योगपतीच्या सुनेचा संशयास्पद मृत्यू झाला असून कुटुंबीयांनी दीर्घकाळ मानसिक आणि शारीरिक छळाचे गंभीर आरोप केले आहेत.
Delhi Crime: पतीचे अनैतिक संबंध, गर्भवती असताना अत्याचार… फोन वापरण्यासही बंदी; दिल्लीतील नामांकित उद्योगपतीच्या सुनेनं उचललं टोकाचं पाऊल

दिल्लीतील वसंत विहार परिसरात एका उद्योगपतीच्या सुनेने कथितरीत्या आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघड झाली आहे. मृत महिलेच्या कुटुंबीयांनी थेट मानसिक व शारीरिक छळाचे गंभीर आरोप करत पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी एफआयआर नोंदवून तपासाला सुरुवात केली आहे. मृत महिलेच्या आईनं या प्रकरणात सीबीआय चौकशीची मागणी केली असून यामुळे या घटनेवर अधिकच गडद सावट पसरले आहे.

एफआयआरमध्ये नमूद माहितीनुसार, पीडित महिलेला गेल्या काही वर्षांपासून वैवाहिक आयुष्यात सतत अपमान आणि हिंसाचाराचा सामना करावा लागत होता. या अविरत त्रासामुळे ती मानसिकरीत्या खचली आणि शेवटी टोकाचे पाऊल उचलल्याचे नातेवाईकांचे म्हणणे आहे. 2011 दरम्यान, पती आणि सासूने महिलेवर जोरजबरदस्ती केली आणि पहिल्या मजल्यावरून तिला ओढत नेले, असा गंभीर आरोप तिच्या आईने केला आहे. तसेच गर्भवती असताना तिच्यावर अत्याचार करण्यात आल्याचा धक्कादायक दावा तक्रारीत नमूद करण्यात आला आहे.

हेही वाचा: Pravin Darekar On Deepak Kesarkar: नारायण राणे यांची काळजी करू नका…'; प्रवीण दरेकर यांचा दीपक केसरकर यांना सल्ला

महिलेने हा सर्व छळ आपल्या आईला सांगितल्यानंतर कुटुंब दिल्लीला रवाना झाले. तेव्हा सासरच्या मंडळींनी माफी मागत पुन्हा अशी वागणूक न देण्याचे आश्वासन दिले होते. काही काळ परिस्थिती सुधारल्याचे भासले. मात्र मुलाच्या जन्मानंतर तर आणखी धक्कादायक सत्य समोर आले. पतीचे अनैतिक संबंध असल्याची माहिती पीडितेला मिळाली. त्यामुळे ती आपल्या बाळासह माहेरी निघून गेली. जवळपास वर्षभरानंतर सासरच्यांनी तिला परत नेले, पण तेव्हाही तिच्यावरील छळ थांबला नाही, असा कुटुंबाचा आरोप आहे.

मृत महिलेच्या आईने पोलिसांना सांगितले की, मुलीला वारंवार अपमानास्पद वागणूक दिली जात होती. तिच्या हालचालींवर बंधने घालण्यात आली, अगदी मोबाईल फोन वापरण्यासही बंदी होती. अनेक महिन्यांच्या मानसिक तणावामुळे आणि सतत चाललेल्या अत्याचारामुळे मुलीनं आयुष्य संपवण्याचा मार्ग निवडला, असा आरोप कुटुंबीयांनी स्पष्टपणे केला आहे. घटनेच्या दिवशी दुपारी कुटुंबाला एक फोन आला. महिलेला तातडीने रुग्णालयात नेण्यात आले असून तिचा मृत्यू झाल्याची माहिती देण्यात आली. या बातमीने कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला.

महिलेचा मृत्यू आत्महत्या की संशयित हत्या, याबाबत अद्याप स्पष्टता नाही. पोलिसांनी विविध शक्यता तपासात शोध सुरू केला असून फॉरेन्सिक अहवाल, जबाब आणि घरातील परिस्थितींची माहिती तपासात महत्त्वाची ठरणार आहे. या संशयास्पद मृत्यूला अनेक गंभीर आरोपांची जोड मिळाल्याने प्रकरण अधिकच गुंतागुंतीचे बनले आहे. नेमके सत्य काय आहे, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

हेही वाचा: Australian PM Wedding : 62 वर्षीय ऑस्ट्रेलियन पंतप्रधान अँथनी अल्बनीज यांचा अजब रेकॉर्ड, कारण ऐकून तुम्ही व्हाल थक्क

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version