जय महाराष्ट्र, मुंबई
बॉलिवुडमधील सध्याची लोकप्रिय जोडी दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंहने त्यांच्या चाहत्यांसाठी आनंदाची गोड बातमी दिली आहे. लवकरच दीपिका आणि रणवीर लग्नाच्या बंधनात अडकले जाणार आहेत.
सुत्रांच्या माहितीनुसार, मागील आठवड्यांत दीपिकाच्या आई-वडिलांनी मुंबईमध्ये रणवीरच्या आई-वडिलांची भेट घेउन लग्नाची बोलणी केली. या बैठकीतं त्यांच्या लग्नाची तारीख ठरवल्याचे समजतेय. येत्या 3-4 महिन्यांत ही जोडी विवाहबद्ध होण्याची चर्चा आहे. लग्नाची बैठक पार पाडल्यानंतर हे दोन्ही परिवार वरळी मधील एका पंचतारांकीत हॉटेलमध्ये जेवायला गेले होते.
रणवीर आणि दिपिकाला डेस्टिनेशन वेडिंग करण्याची इच्छा होती, मात्र आई-वडिलांच्या इच्छेनुसार हे लग्न मुंबईतील एका आलिशान ठिकाणी, दाक्षिणात्य परंपरेनुसार होईल. रिसेप्शनचे आयोजन मुंबईतील पंचतारांकीत हॉटेलमध्ये करण्यात येणार असल्याचे समजतेय.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.