जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई
संजय लीला भन्साळी यांच्या बहुचर्चित, बहुप्रतिक्षित आणि प्रदर्शनापूर्वी तितकाच वादग्रस्त ठरलेला ‘पद्मावती’ या सिनेमामागील वाद कमी होण्याचे नाव घेत नाहीयेत. या सिनेमाला प्रचंड विरोध होतोय.
यातच पद्मावती सिनेमा प्रदर्शित झाला तर या सिनेमातील अभिनेत्री दीपिका पादुकोणचे नाक कापून टाकू, अशी धमकी राजपूत करणी सेनेने दिली आहे. या पार्श्वभूमीवर मुंबई पोलिसांनी दीपिका पादुकोणच्या घराबाहेर सुरक्षा व्यवस्थेत वाढ केली आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.