वृत्तसंस्था, नवी दिल्ली
पद्मावत सिनेमातील ‘घूमर’ गाण्याचं नव व्हर्जन आज रिलीज करण्यात आलं. करणी सेनेच्या कट्टर विरोधानंतर सूचवलेल्या सूचनांप्रमाणे गाण्यात बदल करण्यात आलेत.
आधी या गाण्यात दीपिकाची कंबर दिसत होती. मात्र सेन्सॉर बोर्डाने सूचवलेल्या बदलांनंतर नव्या गाण्यात दीपिकाची कंबर झाकण्यात आलीये.
शिवाय यूट्यूबवरूनही ओरिजिनल जुनं गाणं हटवण्यात आलं आहे. गाण्यात ज्या ठिकाणी दीपिकाची कंबर दिसत आहे, ते कम्युटर ग्राफिक्सच्या माध्यमातून लपवलं आहे.
ज्या ठिकाणी दीपिकाची कंबर दिसत आहे, ते दृश्य राणी पद्मावतीच्या प्रतिमेच्या विरोधी आहे. त्यामुळे या गाण्यात आवश्यक बदल करण्यास सांगितलं होतं.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.