‘नारायण राणेंना निवडणुकीत केसरकारांचा पाठिंबा’

‘नारायण राणेंना निवडणुकीत केसरकारांचा पाठिंबा’

तळकोकणातील राजकारणातील सराईतपणे बदलणाऱ्या भूमिकेची बातमी. कोकणातला राणे आणि केसरकर वाद सर्वाना माहित असताना शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी लोकसभेला जर नारायण राणे उमेदवार असतील तर त्यांचा स्वतः प्रचार करून त्यांना निवडून आणणार असे वक्तव्य करून सर्वानाच चकीत केलं आहे. केसरकर एवढ्यावरच थांबले नाहीत तर आपण नारायण राणेंचा आदराने उल्लेख करतो अस देखील म्हणाले आहेत. त्यानंतर दीपक केसरकर यांनी आपले वाद हे वैयक्तिक नव्हते तर ते तात्विक वाद होते असेही ते म्हणाले. कोकणात दहशतवाद असा नेहमी उल्लेख करणारे आणि लोकसभेला नारायण राणेंच्या पुत्राला आपणच पाडलं अस ठणकावून सांगणाऱ्या दीपक केसरकर यांच्या या वक्तव्यानंतर सर्वांनीच्या आशार्याने भुवया उंचावल्या.

राणे आणि केसरकर यांच्या वादाविषयी बोलताना केसरकर यांनी आपण राजकीय भूमिकेसाठी आणि कोकणच्या विकासासाठी मी त्यांचा प्रचार करणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. नारायण राणे यांच्यासोबत कोणत्याही प्रकारचा माझा वैयक्तिक वाद नाही. राजकीय वाद हे तात्पुरते असतात, आणि आमच्यातील वाद हे मिटलेले आहेत. त्यामुळे आता आमचा जिल्हा शांत आहे.

तसेच भाजप आणि शिंदे गटाची युती भक्कम असल्याचा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला. त्यांना भाजपकडून जर उमेदवारी मिळत असेल तर भाजपचा उमेदवार म्हणून मी त्यांचा प्रचार करणार आहे. आणि त्यांच्या मंत्री पदामुळे कोकणाचा कायापालट होऊ शकतो. त्यामुळे त्यांनी तिकडे अधिक लक्ष घालावे अशी मागणीही त्यांनी यावेळी केली.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version