जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई
राज्यातील 2 मोठ्या शहरांना जोडणारी लाईफलाईन म्हणजेचं ‘डेक्कन क्वीन’चा आज वाढदिवस आहे. 1 जून 1930 रोजी ‘डेक्कन क्वीन’ ही पहिल्यांदा रुळावर धावली. ‘डेक्कन क्वीन’चं नाव सुरुवातीला ‘ब्लु बर्ड व्हॅली’ असे होते, मात्र कालांतराने प्रवाश्यांच्या मागणीने या गाडीला डेक्कन क्वीन असं नाव देण्यात आलं. प्रवाशांच्या अविरत सेवेत पुणे – मुंबई प्रवास करणाऱ्या या रेल्वे गाडीला आज 89 वर्ष पूर्ण झाली आहेत.
‘डेक्कन क्वीन’च्या वाढदिवसानिमित्त पुणे रेल्वेस्थानकावर केक कापून प्रवाशांनी डेक्कन क्वीनचा वाढदिवस साजरा केला आहे. यावेळी आपल्या लाडक्या राणीला सजवण्यात देखील आलं. लाडक्या डेक्कन क्वीन चा वाढदिवस साजरा करण्यासाठी प्रवासी मोठया प्रमाणात जमले होते.
पुणे – मुंबई हे अंतर अवघ्या 2 तास 22 मिनिटात गाठणारी ‘डेक्कन क्वीन’ ही पहिली ट्रेन आहे. यानिमित्ताने डेक्कन क्वीन मध्ये काही नवीन बदल करण्यात यावेत तसेच 17 बोगी असलेली ही डेक्कन क्वीन 24 बोगीची करण्यात यावी अशी मागणी प्रवाश्यांनी व्यक्त केली आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.