गडकरींना पुन्हा जीवे मारण्याची धमकी

गडकरींना पुन्हा जीवे मारण्याची धमकी

मुंबई, १५ मे २०२३, प्रतिनिधी : मागच्याच महिन्यात केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी धमकी आली होती. त्यानंतर आता पुन्हा एकदा त्यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे.

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना काल संध्याकाळी त्यांच्या दिल्लीतील निवासस्थानी फोन करून जीवे मारण्याची धमकी देण्यात आलेली आहे. गडकरींच्या कार्यालयाने दिल्ली पोलिसांना याची माहिती दिली आणि आता पोलिसांकडून या प्रकरणाचा तपास सुरू आहे. ‘एएनआय’ने यासंदर्भातील वृत्त दिले आहे. दिल्ली पोलिसांचे म्हणण्यानुसार, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या निवासस्थानी आलेल्या जीवे मारण्याच्या धमकीच्या फोनची माहिती त्यांच्या कर्मचाऱ्यांनी पोलिसांना दिली होती. पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, घटनेची पडताळणी केली जात असून, तपास सुरू आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version