जय महाराष्ट्र न्यूज, रायगड
रायगड जिल्ह्यातील तळा तालुक्यात एक बिबट्या मृत अवस्थेत आढळून आला. या बिबट्याची सर्व नखे आणि एक दात गायब झाल्याने तस्करी करणाऱ्यांनी बिबट्याची हत्या केल्याचा संशय व्यक्त करण्यात येतोय.
याबाबत वन खात्याने अवघ्या चोवीस तासांत धडक कारवाई करून संशयित सहा जणांना बेड्या ठोकल्या आहेत.
अटक करण्यात आलेल्या आरोपींकडून बिबट्याची बारा नखे हस्तगत करण्यात आली आहेत.
या सर्व आरोपींना न्यायालयाने सोमवारपर्यंत फॉरेस्ट कस्टडी सुनावलीय. यातील अल्पवयीन मुलाला कर्जत येथील बाल न्यायालयासमोर हजर करण्यात आलंय.
या भागात वन्य प्राण्यांची हत्या करून त्यांची तस्करी करणारी मोठी टोळी कार्यरत असावी असा संशय वन खात्याच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केलाय.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.