उन्हवरे खाडीत 3 ते 4 फुटांचा डॉल्फीन मासा मृतावस्थेत सापडला

उन्हवरे खाडीत 3 ते 4 फुटांचा डॉल्फीन मासा मृतावस्थेत सापडला

जय महाराष्ट्र न्यूज, दापोली

दापोलीतल्या उन्हवरे खाडीत बुधवारी एक डॉल्फीन मासा मृतावस्थेत सापडला. या डॉल्फीन माशाची उंची 3 – 4 फुटांची होती. अचानकपणे हा डॉल्फिन मासा अशा पद्धतीनं सापडल्यामुळे तेथील रहीवाशांमध्ये एकच खळबळ उडाली होती.

माशाच्या मृत्यूचं कारण आद्याप उघड झालेल नाही. परंतू वाढत्या प्रदुषणामुळे तो मृत पावल्य़ाची शक्यता तेथील रहिवाशांकडून वर्तवली जातेय. यावरून समुद्रातील जीव सृष्टीवर वाढत्या प्रदुषणाचा परिणाम होत असल्याच स्पष्ट होत आहे.

जेव्हा हा डॉल्फीन मासा खाडीत मृत अवस्थेत सापडला तेव्हा तेथे या माशाला पाहण्यासाठी रहिवाशांनी गर्दी केली होती. जल प्रदूषण आणि मृत माशांचे वाढते प्रमाण या दोन्ही समस्या वाढत चालल्या असून आता प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष पाहील हे पहान गरजेच आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version