Ahilyanagar News : भयंकर! किल्ल्याच्या खंदकात अर्धवट कुजलेल्या अवस्थेतील बेवारस मृतदेह; तब्बल 15 तासांनतर मृतदेह बाहेर काढण्यात पोलिसांना यश

Ahilyanagar News : भयंकर! किल्ल्याच्या खंदकात अर्धवट कुजलेल्या अवस्थेतील बेवारस मृतदेह; तब्बल 15 तासांनतर मृतदेह बाहेर काढण्यात पोलिसांना यश

अहिल्यानगर : अहिल्यानगर येथील प्रसिद्ध भुईकोट किल्ल्याच्या खंदकात 10 ते 15 दिवस जुना बेवारस मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. पर्यटनासाठी आलेल्या नागरिकांना खंदकात मृतदेह दिसल्यानंतर त्यांनी भिंगार कॅम्प पोलिसांना माहिती दिली. किल्ल्याची उंची आणि खंदकाची खोली जास्त असल्याने अग्निशामक दल आणि पोलिसांना मृतदेह बाहेर काढण्यासाठी मोठी कसरत करावी लागली. सुमारे 12 ते 15 तासांचा कालावधी मृतदेह बाहेर काढण्यासाठी लागला असून मृतदेह अर्धवट कुजलेल्या अवस्थेत असल्याने त्याची ओळख पटवणे कठीण झाले आहे. याप्रकरणी पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली असून मृतदेह शवविच्छेदनासाठी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये पाठवला आहे. तसेच नागरिकांपैकी कोणाची व्यक्ती हरवलेला असल्यास त्यांनी भिंगार कॅम्प पोलिसांशी संपर्क साधावा असे आवाहन सहाय्यक पोलीस निरीक्षक तेजश्री थोरात यांनी केले आहे.

हेही वाचा : Crime News : प्रेयसीच्या लेकीचा विनयभंग करणं नराधम प्रियकराला पडलं महागात; संतप्त आईने गुप्तांग कापलं अन्…

 

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version