दयाबेन गोकुलधाममध्ये परतणार?

दयाबेन गोकुलधाममध्ये परतणार?

मुंबई, ३० जुलै २०२३, प्रतिनिधी : ‘सोनी सब’ या वाहिनीवरील ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ ही मालिका गेल्या १५ वर्षांपासून प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे. या १५ वर्षात मालिकेने अनेक चढ – उतार पाहिले. पण मालिकेतील कलाकारांनी मात्र प्रेक्षकांना पोट धरुन हसवणं थांबवलं नाही. परंतू काही काळापूर्वी मालिकेतील दयाबेन म्हणजे अभिनेत्री दिशा वकानी हिने मालिका सोडली आणि चाहत्यांमध्ये निराशा पसरली. तिला आजपर्यंत चाहते विसरू शकलेले नाहीत.

अशातच आता दयाबेन पुन्हा मालिकेत पदार्पण करणार असल्याच्या चर्चांनी जोर धरला आहे. मालिकेला १५ वर्ष पूर्ण झाल्यामुळे निर्माते असित मोदी यांनी देखील दयाबेन पुन्हा मालिकेत पदार्पण करणार का? यावर मौन सोडलं. सध्या सर्वत्र मोदी यांच्या वक्तव्याची चर्चा रंगू लागल्यात.

‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ या मालिकेला १५ वर्ष पूर्ण झाल्यामुळे निर्माते असित मोदी यांनी चाहत्यांना आनंदाची बातमी दिली आहे. असित म्हणाले, ‘१५ वर्षांच्या प्रवासात प्रेक्षकांनी मालिकेला भरभरुन प्रेम दिलं, पण तरी देखील चाहत्यांना गोकुळधाम सोसायटीमधील एका सदस्याची आठवण कायम येत असते. दयाबेन हिला चाहत्यांनी भरभरून प्रेम दिलं. आज देखील चाहते दयाच्या प्रतीक्षेत आहेत…’

‘दयाबेन म्हणजे दिशा वकानी लवकरच मालिकेत परतणार आहे…’ असं वक्तव्य असित मोदी यांनी केलं आहे. म्हणून दिशा वकानी पुन्हा मालिकेत कधी पदार्पण करणार याकडे सगळ्यांच्या नजारा आहेत. पण आता दिवाळीत अभिनेत्री मालिकेत पुन्हा दमदार पदार्पण करणार अशी शक्यता वर्तवली जात आहे. मालिकेच्या एका एपिसोडमध्ये सुंदरलाल याने दयाबेन दिवाळीत गोकुळधाम सोसायटीत येणार अशी घोषणा केली होती. आता या पुढे काय होणार याकडे प्रेक्षक नजर लावून आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version