जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई
दाऊद इब्राहिम हा आपल्या मुलाबद्दल चिंतेत आहे. त्यातच आता तीन दशके त्याला साथ देणारा छोटा शकील डी कंपनीतून बाहेर पडलाय. दाऊदचा मुलगा मोईन याला दाऊद करीत असलेलं काम पसंत नाही.
याच गोष्टीवरून दाऊद आणि मोईनमध्ये गेल्या बऱ्याच महिन्यांपासून संवाद झालेला नाही.आणि दाऊद आपल्या मुलाच्या या निर्णयावरून नैराश्येत गेला आहे.
ठाणे क्राईम ब्रांचच्या ताब्यात असलेला दाऊदचा भाऊ इकबाल कासकरनं या संदर्भात काय कबुलीजबाब दिलाय
– मोईनला कुराण तोंडपाठ असून तो “हाफिज-ए-कुराण” बनला आहे
– मौलाना म्हणून मोईन हा लहान मुलांना कुराण शिकवतो
– सध्या त्याचं वास्तव्य कराचीमधील सौदी मस्जिदमध्येच आहे.
– मोईन स्वतःची वेगळी ओळख दाखवतो.
– तसेच दाऊदच्या वाईट कामाबद्दल मोईन अल्लाकडे माफी देखील मागतो.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.