दाऊद गँगमधील तारिक परवीनला अटक

दाऊद गँगमधील तारिक परवीनला अटक

वृत्तसंस्था, मुंबई

डॉन दाऊदच्या गँगला दणका मिळाला आहे. या गँगमधील तारिक परवीनला अटक करण्यात आली आहे. छोटा शकीलचा उजवा हात म्हणून तारिकची ओळख आहे.

मुंब्रा हत्या प्रकरणातील सूत्रधार म्हणून त्याला बेड्या ठोकण्यात आला आहे. 1998ला ही हत्या झाली होती. तेव्हापासून तारिक फरार होता.

छोटा शकीलच्या सांगण्यावरून तारिकनं ही हत्या केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. ठाणे खंडणीविरोधी पथकानं त्याला गजाआड केलंय.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version