जय महाराष्ट्र न्यूज, रत्नागिरी
रत्नागिरीमध्ये कोसळत असलेल्या पावसामुळे दापोली तालुक्यातील करजगाव समुद्र चांगलाच खवळला.
या खवळलेल्या समुद्रामुळे जांभा चिऱ्याचा संरक्षण बंधारा वाहून गेला. त्यामुळे गावतील लोकामध्ये दहशत निर्माण झाली.
भरतीच्या वेळेत समुद्राचं पाणी ग्रामस्थांच्या घरात घुसत आहे. जिल्हा प्रशासनाकडे प्रतिबंधक बंधारा बांधण्यासाठी ग्रामस्थांनी गेल्या वर्षी उपोषणही केलं होते.
मात्र, त्याचा काहीच उपयोग झालेला नाही. या समुद्राच्या उधाणामुळे नारळाची झाडंही उन्मळून पडली आहेत. तर, सरकारनं याकडे लक्ष देऊन बंधारा पूर्ण करण्याची
मागणी ग्रामस्थांनी केली.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.