जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई
भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवेंनी शेतकऱ्यांबद्दल केलेल्या वादग्रस्त वक्तव्याचा राज्यभरात निषेध व्यक्त केला जात आहे. कोल्हापुरातल्या मिरजकर तिकटी परिसरात दानवेंविरोधात शिवसेनेतर्फे आंदोलन करण्यात आलं.
यावेळी दानवेंच्या प्रतिकात्मक पुतळ्याला काळं फासण्यात आलं तसंच त्या पुतळ्याला चपलांचा मार देऊन दानवेंविरोधात जोरदार घोषणाबाजीही करण्यात आली.
शेतकऱ्यांच्या जीवावर निवडून येणारे सत्तेत आल्यावर शेतकऱ्यांबद्दल अपशब्द कसे काय काढू शकतात असा सवालही यावेळी शिवसेनेतर्फे करण्यात आला. एवढच नाही तर दानवेंनी शेतकऱ्यांची माफी मागावी नाहीतर हे आंदोलन आणखी तीव्र करू असा इशाराही शिवसेनेनं दिला.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.