दानवेंच्या ***वर गोळी मारा; धनंजय मुंडेंच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना दानवे भलतेच संतापले

दानवेंच्या ***वर गोळी मारा; धनंजय मुंडेंच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना दानवे भलतेच संतापले

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

दानवेंच्याच बुडावर गोळी मारण्याची वेळ आली असल्याचे धक्कादायक वक्तव्य केले राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांनी केले होते. रावसाहेब दानवेंनी यावर आपली प्रतिक्रिया देताना याचे खापर प्रसिद्धी माध्यमांवर फोडले आहे. प्रसिद्धी माध्यमांनी मागचं-पुढंच कापून फक्त तेवढचं दाखवल्याचा आरोप दानवेंनी केला आहे.   

अहमदनगर जिल्ह्यात ऊस दरासंदर्भात आंदोलन सुरू असताना पोलिसांनी शेतकऱ्यांवर गोळीबार केला होता. या गोळीबारात जखमी झालेल्या शेतकऱ्यांची भेट घेतल्यानंतर दानवे यांनी शेतकऱ्यांच्या पायावर गोळीबार करायला हवा होता असं वक्तव्य केलं होतं त्यानंतर धनंजय मुंडेंनी दानवेंच्या त्या वादग्रस्त वक्तव्याचा समाचार घेत आता दानवेंच्याच बुडावर गोळी मारण्याची वेळ आली असल्याचे धक्कादायक वक्तव्य केले होते.   

दरम्यान, राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार नागपुरमधल्या हिवाळी अधिवेशनानंतर होणार असल्याची माहिती भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी आज नागपुरात दिली. नारायण राणे यांच्यामुळं हा विस्तार लांबलेला नाही, असंही त्यांनी स्पष्ट केलं. 

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version