इंजिनशिवाय एक्स्प्रेस धावली 10 किलोमीटरपर्यंत

इंजिनशिवाय एक्स्प्रेस धावली 10 किलोमीटरपर्यंत

जय महाराष्ट्र न्यूज, ओडिशा

इंजिनशिवाय एक्स्प्रेस चक्क 10 किलोमीटरपर्यंत धावली असल्याची घटना ओडिशामध्ये घडलीय. टिटलागड स्थानकात इंजिन बदलले जात असताना एक्स्प्रेसचे डबे पुढे निघाले. उतार असल्याने डब्यांचा वेग वाढला. त्यानंतर केसिंगो स्थानकापासून काही अंतरावर ही एक्स्प्रेस थांबली आणि प्रवाशांनी सुटकेचा श्वास घेतला. रेल्वेच्या सतर्क कर्मचाऱ्यांनी अत्यंत सावधपणे ही ट्रेन थांबवली, ते रुळांवर छोटे दगड ठेवत गेले. त्यामुळे एक्स्प्रेसचा वेग कमी होत गेला. मात्र, हे करताना प्रवाशांच्या जिवाला धोका निर्माण होणार नाही याचीदेखील दक्षता घेतली जात होती.

एक्स्प्रेसचा हा थरार मोबाईल कॅमेरात कैद करण्यात आला. अहमदाबाद- पुरी एक्स्प्रेस टिटलागड स्थानकात संध्याकाळी पोहोचली होती. एक्स्प्रेसच्या इंजिनची दिशा बदलण्याचे काम या स्थानकावर होते. इंजिन बदलले जात असताना डब्यांचे ब्रेक लावणे अपेक्षित असते. मात्र, अहमदाबाद- पुरी एक्स्प्रेसमध्ये याचे पालन केले गेले नाही. रेल्वे कर्मचाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळे हा प्रकार घडला असून दोन कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाईदेखील करण्यात आलीय.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version